
लेक लाडकी योजना LEK LADAKI YOJANA हि महाराष्ट्र शासनाची मुलींसाठी सुरु केलेली योजना आहे. लेक लाडकी योजना सुरु करणे हे मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन देणे तसेच मुलींच्या शिक्षणाची खात्री देणे यासाठी सन २०२३-२०२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणात “मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी हि नवीन योजना सुरु करण्यात येईल. पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलींचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख देण्यात येतील.” ही घोषणा करण्यात आली होती. त्यास अनुसरून महाराष्ट्रात लेक लाडकी योजना सुरु करणे शासनाच्या विचाराधीन होते.
लेक लाडकी योजना LEK LADAKI YOJANA ही माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुधारित आवृत्ती आहे. महाराष्ट्रात १ एप्रिल २०२३ नंतर जन्माला आलेल्या मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरु करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.
लेक लाडकी योजना LEK LADAKI YOJANA राबविण्याचे उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत.
- मुलींचा जन्मदर वाढविणे.
- मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देणे.
- मुलींचा मृत्यू दर कमी करणे.
- मुलींच्या शिक्षणास चालना देणे.
- कुपोषण कमी करणे.
- बालविवाह रोखणे.
- शाळाबाह्य मुलींचे प्रमाण नाहीसे करणे.
महत्वाची माहिती: लेक लाडकी योजना LEK LADAKI YOJANA
लेक लाडकी योजना LEK LADAKI YOJANA पात्र होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- मुलीचा जन्म दाखला.
- १ लाखापेक्षा कमी उत्पन्न असल्याचा कुटुंबप्रमुखाचा दाखला. तहसीलदारांचा दाखला आवश्यक राहील.
- मुलीचे आधार कार्ड (प्रथम लाभासाठी ही अट शिथिल करण्यात आली आहे.)
- पालकांचे आधार कार्ड झेरॉक्स प्रत.
- बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत (आई व मुलीचे संयुक्त बँक खाते असल्यास सोयीचे राहील.)
- शिधापत्रिका / रेशनकार्ड ( केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड झेरॉक्स प्रत )
- मतदानकार्ड ( शेवटच्या लाभासाठी मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यावर मुलीचे नाव मतदार यादीत असल्याचा पुरावा )
- दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या टप्प्यावरील लाभ घेण्यासाठी शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा बोनाफाईड.
- पहिल्या मुलीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी व दुसऱ्या मुलीच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सदर करताना कुटुंब नियोजन शस्रक्रिया प्रमाणपत्र सदर करणे आवश्यक राहील.
- शेवटच्या टप्प्याच्या लाभाकरिता मुलगी अविवाहित असणे आवश्यक राहील. अविवाहित असल्याबाबत मुलीचे स्वयंघोषणापत्र आवश्यक राहील.
लेक लाडकी योजना LEK LADAKI YOJANA अंतर्गत पुढील अटी शर्ती व त्यासाठी आवश्यक कागदपत्रे यांच्यानुसार पिवळ्या व केशरी शिधापत्रिका / रेशनकार्डधारक कुटुंबातील मुलींच्या जन्मानंतर पहिल्या टप्प्यात ५ हजार रुपये, दुसऱ्या टप्प्यात इयत्ता पहिलीत गेल्यानंतर ६ हजार रुपये, तिसऱ्या टप्प्यात इयत्ता सहावीत गेल्यानंतर ७ हजार रुपये, चौथ्या टप्प्यात इयत्ता अकरावीत गेल्यानंतर ८ हजार रुपये तर पाचव्या व अंतिम टप्प्यात मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये यानुसार एकूण १,०१,००० /- एवढी रक्कम देण्यात येईल.
लेक लाडकी योजना LEK LADAKI YOJANA लाभ घेण्यासाठी खालीप्रमाणे नियम अटी व शर्ती लागू राहतील
- लेक लाडकी योजना LEK LADAKI YOJANA पिवळ्या व केशरी रेशनकार्ड / शिधापत्रिकाधारक कुटुंबात दिनांक १ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या एक अथवा दोन मुलींसाठी लागू असेल. एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीसाठी लागू राहील.
- लेक लाडकी योजना चा LEK LADAKI YOJANA लाभ घेण्यासाठी पहिल्या मुलीच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या मुलीच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सदर करताना कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
- लेक लाडकी योजना LEK LADAKI YOJANA लाभ घेण्यासाठी पहिल्या प्रसुतीनंतर दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्य जन्माला आल्यास एक मुलगी अथवा दोन्ही मुली लेक लाडकी योजनेच्या लाभासाठी पत्र असतील. परंतु त्यानंतर माता किंवा पिता यांपैकी एकाला कुटुंब नियोजन शस्रक्रिया करणे बंधनकारक राहील.
- लेक लाडकी योजना LEK LADAKI YOJANA लाभ दिनांक १ एप्रिल २०२३ पूर्वी जन्मलेला मुलगा अथवा मुलगी असेल आणि त्यानंतर जन्मास आलेल्या दुसऱ्या मुलीला अथवा जुळ्या मुलींना दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल. मात्र त्यासाठी माता अथवा पिता यांपैकी एकाने कुटुंब नियोजन शस्रक्रिया करणे बंधनकारक राहील.
- लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे कुटुंब महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे बंधनकारक आहे.
- लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीचे बँक खाते महाराष्ट्र राज्यातलेच असावे अन्यथा लाभ मिळणार नाही.
- लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी सदर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख रुपयापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
लेक लाडकी योजना LEK LADAKI YOJANA लाभ घेण्या साठीची कार्यपद्धती खालीलप्रमाणे आहे
- लेक लाडकी योजना LEK LADAKI YOJANA या महाराष्ट्र शासनाच्या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी मुलीच्या पालकांनी दि. १ एप्रिल २०२३ रोजी जन्मलेल्या अथवा त्यानंतर मुलीचा जन्म झाल्यानंतर संबंधित ग्रामीण अथवा नागरी क्षेत्रातील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेत मुलीच्या जन्माची नोंदणी करावी. ग्रामीण भागात ग्रामपंचायत कार्यालयात नोंदणी करावी तसेच शहरी अथवा निमशहरी भागात नगर पंचायत, नगर परिषद, नगर पालिका महानगर पालिका तसेच ग्रामीण रुग्णालयात नोंदणी करावी. मुलीच्या जन्माची नोंदणी केल्यानंतर, त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे नमूद केल्यानुसार आवश्यक त्या कागदपत्रांसाहित विहित नमुन्यात अर्ज सादर करावा. लाडकी बहिण योजनेसाठी आवश्यक असलेले सर्व अर्ज राज्यातील प्रत्येक नागरी व ग्रामीण बाल विकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद,जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, विभागीय उपायुक्त महिला बाल विकास यांच्या कार्यालयात उपलब्ध असतील. अंगणवाडी सेविकेने संबधित लाभार्त्याकडून अर्ज भरून घ्यावा. गरजेनुसार लाभार्थ्यास अर्ज भरण्यास मदत करावी आणि सदर अर्ज अंगणवाडी पर्यवेक्षिका अथवा अंगणवाडी मुख्यसेविका यांच्याकडे सदर करण्यात यावा.
- लेक लाडकी योजना LEK LADAKI YOJANA लाभार्थीना पात्र करण्यासाठी अंगणवाडी पर्यवेक्षिका अथवा अंगणवाडी मुख्यसेविका यांनी प्राप्त झालेल्या अर्जांची तसेच अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची तपासणी करावी व प्रत्येक महिन्याला नागरी व ग्रामीण क्षेत्रातील बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेच संस्थांमधील अनाथ मुलींच्या बाबतीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी एकत्रित यादी जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद यांना तर मुंबई शहर व मुंबई उपनगर क्षेत्राच्या बाबतीत नोडल अधिकारी यांना मान्येतेसाठी सादर करावी. जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद अथवा नोडल अधिकारी यांनी योग्य ती छाननी करून यादीस मान्यता देऊन आयुक्तालयास सदर करावी. अनाथ मुलींना लाभ मिळण्याबाबत अर्ज सदर करतांना महिला व बाल विकास विभागाच्या सक्षम प्राधिकार्यांकडून देण्यात आलेले अनाथ प्रमाणपत्र अर्जासोबत जोडण्यात यावे.
- संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी व जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद हे यादृच्छिक पद्धतीने जास्त संख्येने अर्ज प्राप्त झालेल्या एखाद्या क्षेत्राची तपासणी करतील व त्यांची खात्री झाल्यानंतर लाभार्थी यादीस मान्यता प्रदान करतील.
- बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेच पर्यवेक्षिका यांनी त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करावी. एखादा अर्ज संपूर्ण भरलेला नसल्यास अथवा सर्व प्रमाणपत्रासह सादर केलेला नसल्यास असा अर्ज मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत पूर्तता करण्याकरता अर्जदारास लेखी कळवावे. त्यानुसार अर्जदाराने १ महिन्याच्या आत कागदपत्रांची पूर्तता करावी. काही अपरिहार्य कारणाने अर्जदार या मुदतीत अर्ज दाखल करू शकला नाही तर त्यास अतिरिक्त १० दिवसांची मुदत वाढ देण्यात यावी. अशा प्रकारे जास्तीत जास्त २ महिन्याच्या कालावधी मध्ये सदरच्या अर्जावरची कार्यवाही पूर्ण करण्यात यावी.
- लेक लाडकी योजना LEK LADAKI YOJANA अंतर्गत प्रत्येक महिन्यात प्राप्त झालेले अर्ज यापैकी अपूर्ण अर्ज व निकाली काढलेल्या अर्जांचा अहवाल प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेपर्यंत जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद तसेच नोडल अधिकारी यांनी आयुक्त, एकात्मिक बाल विकास योजना, नवी मुंबई, महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाकडे सदर करावीत.
लेक लाडकी योजना LEK LADAKI YOJANA सुरु झाल्यापासून ५ वर्षांनंतर सदर योजनेचे मूल्यमापन करून योजना पुढे सुरु ठेवण्याबाबत अथवा राबविण्याबाबत पुढील ५ वर्षान निर्णय घेण्यात येईल.